मारकंडा कंनसोबा येथील स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्याचे वाटप

123

लाकडावूनच्या काळात कार्ड धारकाना मिळाला आधार

चामोर्शी :- तालूकयातील मारकंडा कंनसोबा येथील स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्याचे वाटप करण्यात येत आहे
कोरोणाच्या संकटात लाकडावून असल्याने गरीब मजूराना हाताला कोणत्याही प्रकारचे काम नसल्याने आर्थीक अडचणी निर्माण झाल्या आहेत त्या करीता शासनाने कोणीही उपाशी राहू नये याकरिता मोफत धान्य देण्याचे ठरवले होते. शासनाने घोषणा केल्या प्रमाणे चामोर्शी तालूकयात मोफत धान्याचे वाटप करण्यात येत आहे यात अंत्योदय कार्ड धारकाना पंचवीस कीलो तांदुळ दहा किलो गहू या प्रमाणे मोफत धान्य मिळाल्याची माहिती अंत्योदय कार्ड धारकानी दिली शासनाकडून मोफत धान्य मिळाल्याने कार्ड धारक कुटुंबाला एक महिन्याचा आधार मिळाल्याने कार्ड धारकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पण कोरोणाचे संकट कधी जाईल व लाकडावून कधी संपेल शासनाकडून मोफत धान्य मिळाले परंतू या धान्यासोबत तेल. तिखट. मिठ. भाजीपाला.जिवनावयशक वस्तू वैगरे कसे घ्यायचे असा प्रश्न गरीब मजूरावर पडलेला आहे गेल्या वर्षी पासून कोरोणा संकटात सापडलेल्या मजूराना हाताला कोणत्याही प्रकारचे काम नसल्याने मोठी आर्थीक अडचण निर्माण झाली आहे करीता शासनाने या गरीब जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन आर्थीक मदतीची काहीतरी उपाय योजना करावी असे गरीब मजूराकडून बोलल्या जात आहे कोरोणाच्या संकटात शासन या गरीब मजूराकडे लक्ष देईल का हे पाहणे गरजेचे आहे.