Home गडचिरोली गडचिरोलीत फुले वार्डात 20 कोंबडयाचा मृत्यू ,शहरात विक्रीवर प्रशासनाकडून प्रतिबंध

गडचिरोलीत फुले वार्डात 20 कोंबडयाचा मृत्यू ,शहरात विक्रीवर प्रशासनाकडून प्रतिबंध

482

गडचिरोलीत फुले वार्डात 20 कोंबडयाचा मृत्यू ,शहरात विक्रीवर प्रशासनाकडून प्रतिबंध

तपासणीसाठी 3 मृत कोबंड्या पाठविल्या प्रयोगशाळेत बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर निर्णय

गडचिरोली: येथील फुले वार्डात रहिवासी प्रशांत सदाशिव आंबोरकर यांच्या मालकीच्या 15 ते 20 कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्याने शहरात खळबळ निर्माण झाली आहे.कोंबड्याचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला की वेगळ्या कारणाने झाला याची तपासणी करण्यासाठी मृत्यू पावलेल्या कोंबड्यांना प्रयोगशाळेत
पाठविण्यात आलेले आहे.
फुलवार्ड प्रातिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेअसून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध राहणार आहेत.आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था, व समूहावर साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्हवये कारवाई केली जाईल असे प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालकर यांनी कळविले आहे.

Don`t copy text!