गडचिरोली जिल्ह्यातील लसीकरणाला सुरवात

192

गडचिरोली जिल्ह्यातील लसीकरणाला सुरवात

गडचिरोली जिल्ह्यातील लसीकरणाला सुरुवात झालेली असून यावेळी पहिल्यांदा गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका सारिका दुधे यांना लस देण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील चार लसीकरण केंद्रावर आजपासून प्रतिदिन शंभर प्रमाणे दर दिवशी चारशे आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
आज लसीकरणाच्या शुभारंभप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.