पाच संशयिंताना गजाआड करण्यांत आले
प्रतिनिधी- संभाजी पुरीगोसावी (वाई) :- येथील एमआयडीसीतीमधील साईपुर्ण या कंपनीत चोरट्यांनी तब्बल सहा लाखांचा ऐवज चोरुन नेला होता .वाई पोलिसांनी अवघ्या बारा तासांत या चोरीचा छडा लावला .पाच संशयिंताना गजाआड करण्यांत आले असुन त्यामध्ये वर्षा किशोर जाधव वय 29 उमा रविंद्र जाधव वय 30 ज्योती प्रकाश जाधव वय 28 तिघे रा . लाखानगर वाई . प्रकाश विलास सपोनिशी वय 25 सचिन विलास सपोनिशी वय 25 रा .काशीकापडी झोपडपटी वाई .अशी अटक केलेल्यांची नावे आहेत .वाई पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी याबाबतची माहिती दिली. वाई येथील एमआयडीसीमधील साईपुर्ण या कंपनीत दि .15 जुलै 2021 रोजी चोरट्यांनी वाँल कंपाऊंडवरुन व उघडया दरवाजातुन आतमध्ये प्रवेश केला.कंपनीतील इलेक्ट्रिक मोटारी, स्विच पीव्हीसी पाईप व इतर साहित्य असा सुमारे 6 लाख 8 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याची फिर्याद डाँ .संजय मोरे यांनी वाई पोलिस ठाण्यांत दिली होती.पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल ,अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील ,उपविभागीय पोलिस आधिकारी डाँ .शितल जानवे खराडे यांच्या सुचनेनुसार पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास गुन्हा उघडकीस आण्ण्याच्या सुचना दिल्या . त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारायांनी वाई, एमआयडीसी,बोपडीं परिसरात छापा टाकला.चोरलेल्या मालासह तीन माहिला व दोन पुरुष यांना अटक करण्यांत आली.चोरट्याकडुंन चोरुन विकलेला माल व टेंपो हस्तगत केला आहे.आणखी एका गुन्ह्यांची कबुली दिली आहे .या कारवाईत पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, स .पो .फौ .विजय शिंके,पो .काँ.सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर ,श्रावण राठोड , गोळे माहिला पोलिस नाईक सोनाली माने ,काँ शितल साळुंखे यांनी कारवाईत सहभाग घेतला.वाई पोलिसांच्या धडकेबाज कारवाईबदल पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्याकडुंन वाई पोलिसांचे कौतुक व आभिनंदन केले .