आष्टी पेपर मिल कॉलनीत बिबट्याचा हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

154

बिबट्याचे मानवी हल्लासत्र सुरूच.

चामोर्शी-
तालुक्यातील आष्टी (इल्लुर पेपर कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 29 सप्टेंबर रोज बुधवार ला सकाळी 8 च्या सुमारास घडली.

बबिता दिलीप मंडल वय 45 वर्ष रा. पेपर मिल कॉलनी (आष्टी-इल्लूर)ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

सकाळी 8 च्या सुमारास सदर महिला घरामागे भांडे घासत असताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तीच्यावर हल्ला केला तीने आरडाओरड सुरू केल्यानंतर तिच्या मुलाने व शेजारच्या युवकांनी लागलीच धाव घेतली.त्यांनी बिबट्याच्या तावडीतून महिलेला सोडविले व बिबट्याला परतवून लावले.यात महिलेच्या गळ्यावर गंभीर जखमा आहे.नशीब बलवत्तर म्हणून तीचे प्राण वाचले अन्यथा तीला आपले प्राण गमवावे लागले असते.

या परिसरात बिबट्याचे मानवी हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. याच पेपर कॉलनीत एका 6 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला तसेच या परिसरातील मार्कण्डा येथे 6 वर्षीय मुलाला ठार केले. बिबट्याची दहशत कायम असूनही आणि वनविभागाकडे या नरभक्षक बिबट्याला वारंवार जेरबंद करण्याची मागणी करूनही वनविभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन दुर्लक्ष करीत आहे.या हल्ल्यास वनविभागाचा दुर्लक्षित पणा कारणीभूत असून लवकरात लवकर या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.