गडचिरोली:- दि. २६/०९/२०२१ ला नागपूर येथे विज बिल वसूली करिता गेलेल्या विज कर्मचाऱ्याला ग्राहकाकडून अमानवियरित्या लोखंडी रॉडने जीवघेणी मारहाण करण्यात आली . सदर हल्ल्यात श्री सुखदेव केराम हे विज कर्मचारी रक्तबंबाळ झाले. त्याचा व महाराष्ट्रात इतर ठिकाणी होणाऱ्या मारहाणीच्या घटनेचा महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी, अभियंते संघटना कृती समितीच्या वतीने गडचिरोली येथील प्रविभागीय कार्यालय समोर जाहीर निषेध करण्यात आला. सदर निषेध द्वारसभेत विज कर्मचाऱ्यानी मारहाण करणारे ग्राहक, महावितरण प्रशासन व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध केला. महावितरण कंपनीची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून महाराष्ट्रात दररोज विज कर्मचाऱ्यावर हल्ले होत आहेत. त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली. निषेध द्वारसभेला एस. ई. ए. चे सर्कल सचिव पी. एस. वंजारी , एम. एस. ई. बी. वर्कर्स फेडरेशनचे विभागीय अध्यक्ष श्री रंजन बल्लमवार, विभागीय सचिव श्री राजकुमार हेलवडे,तांत्रिक कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्री एस. वाय. चौधरी, इंटक चे विभागीय अध्यक्ष श्री विशाल केळापुरे व मागासवर्गीय संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्री एस. एन. चौधरी यांनी संबोधित केले.