विहिरगाव (उमरेड रोड)येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचा भव्य सोहळा संपन्न

85

नागपूर:- मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांची प्रमुख उपस्थिती नागपूर शहराच्या लगत असलेल्या विहिरगाव(उमरेड रोड) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचा भव्य सोहळा संपन्न झाला, मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, जिल्हा अध्यक्ष किशोर सरायकर,शहर अध्यक्ष विशाल बडगे, दक्षिण विभाग अध्यक्ष पिंटू बिसेन,नागपूर ग्रामीण उपतालुका अध्यक्ष उमेश कळंबे,मनविसेचे उपजिल्हा अध्यक्ष गौरव पुरी,यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला विहिरगाव येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती, या कार्यक्रमात अनेकांनी मनसेत प्रवेश घेतला ,कार्यक्रमाचे संचलन अंकित झाडे यांनी केले जलोष्यात झालेल्या या शाखा उदघाटन प्रसंगी हेमंत गडकरी, किशोर सरायकर, विशाल बडगे,पिंटू बिसेन यांनी संबोधित केले, कार्यक्रमाच्या प्रारंभी 26 /11 च्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखा अध्यक्ष प्रशांत पाटील, उपशाखा अध्यक्ष शंकर देऊळकर, राज अंभोरे, शुभम श्रीवास्तव यांचेसह विहिरगाव येथील अनेकांनी परिश्रम घेतले, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाखा फलकाचे सुद्धा उदघाटन करण्यात आले