ब्रम्हपुरी तालुक्यातील कळमना येथे जि. प.सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते वर्गखोली बांधकामाचे भुमीपूजन संपन्न

83

ब्रम्हपुरी :- तालुक्यातील कळमना येथे जि. प.सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते वर्गखोली बांधकामाचे भुमीपूजन संपन्न   मौजा.कळमगाव येथे आज दि.३/१२/२०२१ ला नविन वर्गखोली बांधकामाचे भूमिपूजन ब्रम्हपुरी तालुका, गांगलवाडी व मेंडकी क्षेत्राचे.जिल्हा परिषद सदस्य श्री.मा.प्रमोदभाऊ चिमुरकर यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या नविन वर्गखोली बांधकाम.या कामाचे भुमिपूजन जिल्हा परिषद सदस्य श्री.मा.प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते झाले. जिल्हा वार्षिक योजनेतून या बांधकामासाठी ११ लाख रुपये मंजूर झाले. भुमिपूजन सोहळ्याला पंचायत समितीचे सदस्य श्री. ज्ञानेश्वरजी कायरकर,श्री.मनोहरजी गजबे माजी सभापती कृ.उ.बा.समिती, सौ.मंगलाताई लोनबले महीला कॉं.अध्यक्ष, सौ.प्रियंकाताई सोनुले ग्रा.प.सरपंच,श्री. नितीनजी गजबे ग्रा.प.उपसरपंच, सौ.अस्मिताताई सरोते ग्रा.प.सदस्या,श्री. रवींद्रजी कावळे ग्रा.प.सदस्य, सौ.देवीचरणताई बनकर ग्रा.प.सदस्या,श्री. सुनीलजी लोखंडे ग्रा.प.सदस्य,सौ. मंदाताई बनकर ग्रा.प.सदस्या,श्री.धनराज घुटके तंटामुक्ती अध्यक्ष,श्री. छत्रपती सरोदे, श्री.संदीप कावळे, श्री.दिनकर कावळे,श्री. राजू उरकुडे, यांची उपस्थिती होती.