या सहविचार सभेत एकूण 40 विषयावर सखोल चर्चा झाली .
यामध्ये प्रामुख्याने शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त स्तरावर संघटना सहविचार सभा आयोजित करण्यात येतील
न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणीत सुसूत्रता आणण्यात येईल
शाळा समितीचे गठन MEPS कायद्यानुसार आहे का हे पाहिले जाईल, अतिरिक्त शिक्षकांच्या बाबतीत शासन निर्णयानुसार कडक कारवाई करण्यात येईल
शालार्थ आयडी प्रकरणे 30 डिसेंबर अखेर निकाली काढण्यात येणार तसेच त्रुटी असणारे शालार्थ आय डी प्रकरणे शिक्षण आयुक्त कार्यालया मार्फत फेरतपासणी करणार
कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर वेळेत पेन्शन मिळाली नाही तर जबाबदार घटकावर कायदेशीर कारवाई होणार
वरिष्ठ व निवड प्रशिक्षण करता शासनाने प्रशिक्षण फी निर्धारित केली आहे परंतु
संघटनेच्या मागणीनुसार सदर प्रशिक्षण फी 2000 रुपये विनामूल्य व्हावे यासाठी शासनास पत्रव्यवहार करणार
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधीची खाती बंद होणार नाही , डीसीपीएस मधील सुमारे साडे नऊ हजार कोटी रुपये रक्कम NPS कडे वर्ग करण्यात येणार
कोरोना ग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना विशेष रजा मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे 20 ते 40 टक्के अनुदानाच्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर यांना नियमित वेळेत अनुदान मिळण्यासाठी सातत्य राखले जाईल शिक्षक-शिक्षकेतर यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी चा पहिला व दुसरा हप्ता साठी 256 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे तसेच पहिला हफ्ता कर्मचाऱ्यांना मिळाला नाही यास्तव दोषी अधिकरी कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार
वेतनेतर अनुदान दर महिन्याला वेतन अनुदानाच्या पाच टक्के मिळण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करणार थकित वेतन इतर अनुदानाबाबत वित्त मंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले महिला शिक्षकांना बाल संगोपन रजा मिळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचा शासन आदेश आवश्यक आहे यासाठी तात्काळ कार्यवाही करणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.
या व अशा तत्कालीन प्रश्नावर चर्चा झाली
या सहविचार सभेत शिक्षण संचालक महेश पालकर प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्रातांध्यक्ष ा कडू ,सरकार्यवाह नरेंद्र वातकर ,कोषाध्यक्ष किरण भावठाणकर ,आमदार नागो गाणार ,माजी आमदार भगवानराव साळुंखे ,महिला आघाडी प्रमुख पूजा ताई चौधरी ,कार्यालय मंत्री सुनील पंडित पुणे विभाग अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे पुणे विभाग कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय सातपुते, नागपूर विभाग अध्यक्ष के के बाजपेयी ,कार्यवाह योगेश बन,, मराठवाडा विभाग अध्यक्ष नंदकुमार झरीकर ,मराठवाडा विभाग कार्यवाह सुरेश पठाडे मराठवाडा कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे कोकण विभाग उपाध्यक्ष शिवाजी सागडे, रत्नागिरी कार्याध्यक्ष किरण देशपांडे , औरंगाबाद शहर अध्यक्ष गणेश पवार
इत्यादींनी चर्चेत सहभाग घेतला
आभार किरण भावठाणकर यांनी मानले