आश्रमशाळेतील १५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

86

नाशिक:- येथील मुंढेगाव आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मुंढेंगाव येथील आदिवासी आश्रमशाळेत ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील १५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
कोरोनाचा धोका कमी झाल्याने टप्याटप्याने शाळा सुरू करण्यात आल्या.नाशिक जिल्ह्यातील मुंढेगाव येथे १५ विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळून आल्याने पालकवर्गात चिंता निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील पहिली ते पाचवीच्या शाळा सुरू करण्याबाबत फेरविचार व्हावा.अशी मागणी होत आहे.
मुंढेंगाव येथील काही विद्यार्थ्यांना कोरोना सदृश लक्षणे आढळून आल्याने त्यांची एनंटीजन चाचणी करण्यात आली असता ते पाझेटिव्ह आढळून आले आहेत.आता सर्वच विद्यार्थ्यांनची आर.टी. पीसीआर करण्यात आली आहे. रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झालेले आहे.