सम्मयक बौद्ध मंडळ राखी-गुरवळा च्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून गुरवळा येथे सामाजिक प्रबोधन व भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते पार पडले.
बाबासाहेबांचा संपूर्ण जीवनप्रवास त्यांनी केलेले मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य ही एक सामजिक क्रांती होती आणि हीच क्रांती आज च्या परिवर्तनाची नांदी आहे असे प्रतिपादन महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. यावेळी अध्यक्ष कार्यक्रमाचे डॉ.प्रकाश खोब्रागडे होते मुख्य अतिथी म्हणून दिवाकर मिसार, चोकाजी बाबोले, गुरुदेव सेमस्कर, राजू उंदिरवडे, व गावातील सरपंच, प्रतिष्ठित नागरिक तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रेमकुमार खोब्रागडे व संतोषी सुत्रपवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.