Home गडचिरोली वार्षिक पडताळणी व मुद्रांकण न केल्यामुळे वैधमापन शास्त्र गडचिरोली विभागाची तीन ठिकाणी...

वार्षिक पडताळणी व मुद्रांकण न केल्यामुळे वैधमापन शास्त्र गडचिरोली विभागाची तीन ठिकाणी कारवाई

213

गडचिरोली, दि.17, जिमाका :- वैधमापनशास्त्र नागपूर विभागाचे सहनियंत्रक श्री बिरादार, उपनियंत्रक चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याचे ह.तु.बोकडे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली विभागाचे वैधमापनशास्त्र अधिकारी रूपचंद फुलझेले यांनी दिनांक 17 डिसेंबर रोजी धानोरा तालुक्यात विविध 3 ठिकाणी कारवाई केली. वार्षिक पडताळणी व मुद्रांकण न करता वजन वापर केल्या बाबत नियम 12/23 नुसार धान खरेदी केंद्रावर तपासणी करून संबंधित तीन ठिकाणी केंद्रावर 12/23 नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विनोद निकुरे, दूधमाळा,धानोरा, आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, दुधमाळा, धानोरा, विलास एचपी गॅस ग्रामीण वितरक धानोरा यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे रूपचंद फुलझेले वैधमापनशास्त्र अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

Don`t copy text!