गडचिरोली, दि.17, जिमाका :- मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ना.मा.प्र.करिता आरक्षित जागा अनारक्षित करण्यात आलेल्या असून अशा जिल्हयातील नगरपंचायतींच्या जागांसाठी 28 डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जणार आहे. या जागांबाबत सुधारीत फेरसोडत 27 डिसेंबर रोजी मान्य झाल्यानंतर सदर कार्यक्रम जिल्हास्तरावर दि.28 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी 29 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 सुट्टयांचा दिवस वगळून मुदत असणार आहे. आवश्यक असल्यास मतदान 18 जानेवारी रोजी होणार आहे. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक 19 जानेवारी आहे.
यापुर्वी जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमातील व दि.21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाचा निकाल जिल्हयात 23 डिसेंबर रोजी लागणार होता. मात्र नवीन आदेशा नुसार सदर निकाला एकत्रित दिनांक 19 जानेवारी 2022 रोजी जाहीर केला जाणार आहे.
कामगार, कर्मचारी व अधिकारी यांना मतदाना दिवसी सुट्टी
निवडणूक क्षेत्रातील स्थानिक कामगार, कर्मचारी व अधिकारी यांना मतदाना दिवशी दि.21 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बाहेरगावी असणारे तसेच स्थानिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सदर सुट्टी देणेत आली आहे. अपवादात्मक स्थितीत सुट्टी दता येत नसेल तर दोन तासांकरीता मतदान प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी सुट्टी देता येईल असे शासन निर्णयात नमुद करण्यात आले आहे.