निमगाव अंतरगाव परीसरातील घटना
सावली – तालुक्यातील व्याहाड – मुडझा मार्गावरील अंतरगाव जवळ सावली येथुन आपले काम आटोपून करोली येथे जात असताना नामक कांचन प्रभाकर गेडाम राहणार करोली दुचाकी ने गावाकडे जात असताना रोडाच्या कडेला चुरी टाकून असल्याने गाडी स्लीप होऊन २ च्या सुमारास दुचाकी पेटुन खाक झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की कांचन प्रभाकर गेडाम रा.करोली हे करोली येथे जात असताना अंतरगाव येथील पोलीस पाटील यांच्या शेताजवल दुचाकी पेट घेत असताना घाबरून दुचाकी स्वार याने गाडी रोडच्या कडेला टाकली, व बेशुद्ध होऊन पडला,
सदर मार्गावरील ये जा करणाऱ्या लोकांनी त्याला उचलून नेऊन प्राथमिक स्वास्थ केंद्र येथे भरती केले,
मात्र गाडी ही पूर्णता जदुन खाक झाली असून सदर गाडी बजाज डिस्कोवर Mh34 As 0750 ही असून सदर गाडी ही योगेश रामटेके सावली यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे
सदर घटनेची माहिती पाथरी पोलिसांना देण्यात आली आहे
सदर युवकाची प्रकृती ठीक असून
पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहेत