मुस्लिम युवकांचा मनसेत प्रवेश

121

मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व मुस्लिम युवकांचे त्यांच्या गळ्यात मनसेचा दुप्पटा घालून स्वागत केले

नागपूर:- आज नागपुरातील काही मुस्लिम युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला,दक्षिण पश्चिम विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या पुढाकाराने झालेल्या या प्रवेश कार्यक्रमात मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व मुस्लिम युवकांचे त्यांच्या गळ्यात मनसेचा दुप्पटा घालून स्वागत केले,या मुस्लिम युवकांमध्ये काझिम अन्सारी, दिलशाद अन्सारी,मोहम्मद कुरेशी,शमशाद अन्सारी,जफर इकबाल, साजिम मामु,रजाऊल अन्सारी यांचा समावेश होता, अनिधीकृत भोंगा प्रकरणी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची भूमिका योग्य असून ते कुठल्याही जाती धर्माला विरोध करीत नाही ही खात्री पटली म्हणून आम्ही मनसेत प्रवेश करीत आहे असे प्रवेश करणाऱ्या सर्वांनी मत व्यक्त केले,यावेळी कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त असलेले शहर अध्यक्ष अजय ढोके यांनी दूरध्वनीवर प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत केले,हेमंत गडकरी यांचे सह तुषार गीरे,विभाग उपाध्यक्ष चेतन बोरकुटे ,शाखा अध्यक्ष शिरीष पटवर्धन (गुरुजी) उत्तम रागीट,रोहित चकोले इत्यादी उपस्थित होते