अड्याळनजीक दुचाकीचा अपघात दुचाकीवरील वडिलांचा मृत्यु तर मुलगा गंभीर जखमी गडचिरोली

98

चामोर्शी तालुक्यातील येनापुर :- चामोर्शीरोडवरील अड्याळ गावाजवळील वळणावर दुचाकीचा अपघात होऊन अपघातात वडीलाचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 26 एप्रिल मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.

सखाराम बावणे वय 70 वर्ष रा नंदवर्धन ता गोंडपीपरी जि चंद्रपूर असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.तर लक्ष्मण सखाराम बावणे वय 40 वर्ष रा नंदवर्धन ता. गोंडपीपरी जि चंद्रपूर असे जखमीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार MH 34 BY 0285 दुचाकीने नंदनवर्धन कडून चामोर्शी कडे येत असताना येणापूर पासून 2 किलोमीटर अंतरावरील आड्याळ गावाजवळील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीचा अपघात झाला. यात वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात गडचिरोली येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास चामोर्शी पोलीस करीत आहेत