स्वच्छ भारत ग्राम अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी.. मा.खा.अशोकजी नेते

83

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा

 

स्वच्छ भारत ग्राम अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी.. मा.खा.अशोकजी नेते

भारतीय जनता पार्टी ता.सावली च्या वतीने चिखली येथे कार्यक्रम संपन्न.

 

 

दिं.२६ सप्टेंबर २०२२

सावली:-मा.खा.अशोकजी नेते यांनी स्वच्छ भारत ग्राम अभियान अंतर्गत स्वतः व पदाधिकारीही हातात झाडू घेऊन गावातील परिसर स्वच्छ केलं.स्वच्छतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा या दोन्ही विभूतींनी देशात स्वच्छतेचा मूलमंत्र दिला.हाच मूलमंत्र घेऊन आज सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्ताने भरतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने चिखली येथे स्वच्छ भारत ग्राम अभियान हा कार्यक्रम घेण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीं जी यांनी नवी दिल्ली येथे ०२ ऑक्टोबर २०१४ रोजी स्वच्छ भारतअभियानाची सुरूवात करतांना स्वच्छ भारत अभियानाला देशव्यापी एका चळवळीचे स्वरुप देण्यात आले

 

स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे जनतेला आवाहन केले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी स्वत: हाती झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला

रस्त्यावर लोकांनी घाण करु नये व इतरांनाही त्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन त्यांनी केले.जनतेला पंतप्रधानांनी “ ना गंदगी करेंगे, ना करने देंगे” चा मंत्र दिला.याचीच पुनरावृत्ती म्हणून स्वच्छ भारत ग्राम अभियान चिखली येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रतिपादन केले

तथा जिल्हाध्यक्ष ओबिसी आघाडीचे अविनाश पाल व माजी बांध. सभापती संतोषभाऊ तंगडपलीवार यांनी सुद्धा या कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमा प्रसंगी मा.खा.श्री. अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी आ.मोर्चाचे अविनाश पाल,माजी बांध.सभापती जि.प. चंद्रपुर संतोषभाऊ तंगडपलीवार, मा.भृगुवारजी,मा.इंगोलेजी प्रतिभाताई बोबाटे ग्रा.पं.सदस्या, छायाताई चकबडलवार,डॉ.गंगाधर धारणे उपसरपंच,भोजराज धारणे सरपंच बोरमाळा,विलास कावळे, जगदिश हेटकर,जितेंद्र मस्के, उंदीरवाडे सरपंच विहिरगाव, मुकतेश्वर थोरात,रमेशजी लाकडे, रमेश काळबांधे,विनोद बारापात्रे, ओमदेव मस्के,निलेश ठाकरे, प्रकाश करकाडे, पुरुषोत्तम घुबडे, टिकाराम घुबडे,राजू आत्राम,तसेच अनेक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते

कार्यक्रमाचे संचालन जितेंद्र मस्के व आभार प्रदर्शन रमेश लाकडे यांनी केले.