सेवा पंधरवडा कार्यक्रमानिमित्ताने सांत्वन भेट
खासदार अशोकजी नेते यांनी सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत गेवरा खुर्द येथे सहानुभूतीपूर्वक सांत्वनपर भेट देऊन आर्थिक मदत केले
गेवरा खुर्द. येथील घटना
दिनांक २६ सप्टेंबर २०२२
सावली:-तालुक्यातील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवडा कार्यक्रम निमित्याने मान. खासदार अशोकजी नेते यांना तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी गेवरा खुर्द येथील स्व.शरद पंढरी मुनघाटे वय ४५ वर्ष यांचा अचानक आकाशातील वीज पडून जागीच मृत्यू झाला.या घटने संदर्भातील माहिती मा.खा.अशोकजी नेते यांना दिली असता या संबंधी दखल घेऊन गेवरा खुर्द येथे जाऊन त्या कुटुंबीयांचं सांत्वन करून यावेळी आर्थिक मदत देण्यात आली.तसेच काही अडीअडचणी आल्यास आम्ही तुमच्या दुःखात सामील आहो.याप्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी आपल्या भावना व्यक्त केले.
याप्रसंगी खा.अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबिसी आघाडीचे अविनाश पाल, डॉ.गंगाधर धारणे उपसरपंच, जगदिश हेटकर,राजु आत्राम, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.