Home गडचिरोली जनजाती नेता बाबु डाँ.कार्तिकराव उराव यांचे धर्मांतरीतांचे डिलीस्टिंग हे स्वप्न जनजाती सुरक्षा...

जनजाती नेता बाबु डाँ.कार्तिकराव उराव यांचे धर्मांतरीतांचे डिलीस्टिंग हे स्वप्न जनजाती सुरक्षा मंच पुर्ण करणार*

93

*जनजाती नेता बाबु डाँ.कार्तिकराव उराव यांचे धर्मांतरीतांचे डिलीस्टिंग हे स्वप्न जनजाती सुरक्षा मंच पुर्ण करणार*

———————————————

*प्रकाश गेडाम, प्रांत संयोजक*

———————————————

*जनजाती सुरक्षा मंचाच्या विदर्भ कार्यशाळेचे नागपूर येथे आयोजन*

———————————————

*जनजाती नेता उच्च शिक्षीत बाबु डॉ. कार्तिकराव उराव यानी लोकसभेत “संयुक्त समीती”च्या शिफारशी प्रमाणे संविधान कलम 341अन्वये धर्मांतरीताना आरक्षणाचे लाभ मिळत नाहि त्याच प्रमाणे 342 अन्वये धर्मांतरीत आदिवासी/जनजातीना आरक्षणाच्या लाभा पासुन वंचित करण्या बाबत संविधान कलम 342 मध्ये दुरस्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती.मात्र मा.ईंदिराजी गांधी मा.प्रधानमंत्री यानी संयुक्त समीतीच्या शिफारशी मशनरीच्या दबावाखाली येउन लागु केल्या नाही.मा.डॉ. कार्तिकराव जी उराव यांचे अधुरे स्वप्ण.जनजाती सुरक्षा मंच पुर्ण करुन 12 करोड आदिवासी ना न्याय देईल समाजानी जनजाती सुरक्षा मंचाच्या सोबत राहावे असे आवाहन श्री प्रकाश गेडाम प्रांत संयोजक, जनजाती चेतना परीषद, विदर्भ.तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र,महाराष्ट्र. यानी केले*

*जनजाती सुरक्षा मंच विदर्भ च्या वतीने नागपूर येथे आयोजित प्रांत अभ्यास वर्गात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते*

*अभ्यास वर्गाचे उदघाटन मा.सुर्यनारायण सुरी, राष्ट्रीय संघटनमंत्री, जनजाती सुरक्षा मंच. व मा.प्रकाश जी उईके,न्यायाधीश मध्य प्रदेश यांचे हस्ते झाले*

*मंचावर मा.विनायकराव जी सुरतने,क्षेत्र संघटन मंत्री, जनजाती सुरक्षा मंच.मा.संदिपजी कोरोत,विदर्भ अध्यक्ष, जनजाती सुरक्षा मंच,विदर्भ. उपस्थित होते*

*अभ्यास वर्गाला विदर्भातील जनजाती पदाधिकारी,विभाग संघटन मंत्री, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Don`t copy text!