येत्या 3 वर्षात ब्रम्हपुरीची शैक्षणिक व मेडीकल हब अशी ओळख बनविणार. :- नाम.विजय वडेट्टीवार पालकमंत्री यांचे प्रतिपादन

174

येत्या 3 वर्षात ब्रम्हपुरीची शैक्षणिक व मेडीकल हब अशी ओळख बनविणार.
नाम.विजय वडेट्टीवार पालकमंत्री यांचे प्रतिपादन

ब्रम्हपुरी  :- शहराच्या विकासाचा पाया आपण रचलेला आहे. विकासाला गती मिळावी यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असुन विविध योजनांतर्गत भरीव नीधी शहराच्या सर्वांगिण विकासासाठी देण्याचा प्रयत्न करीत आहे. शहराच्या वाढणाऱ्या लोकसंख्येच्या विचार करता येत्या 30 वर्षानंतर पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी पाणीपुरवठा योजनेतंर्गत 25 कोटि रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेस दिला आहे.
ब्रम्हपुरी शहराचा कायापालट होणार असून येत्या काळात आयुर्वेदिक महाविद्यालय, व दर्जेदार शिक्षणाची सोय करून ब्रम्हपुरी शहराची शैक्षणिक व मेडीकल हब अशी ओळख बनवणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत,पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांनी केले.
ते नगरपरिषद ब्रम्हपुरी च्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत शहर पाणी पुरवठा योजनेच्या भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शहराच्या नगराध्यक्षा सौ. रीताताई उराडे, नगरपरिषद उपाध्यक्ष अशोक रामटेके, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, मुख्याधिकारी मंगेश वासेकर, घोडमारे उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम सभापती विलास विखार, आरोग्य सभापती प्रितेश बुरले, नियोजन सभापती बाला शुक्ला, महिला व बालकल्याण सभापती निलीमाताई सावरकर, डाँ नितीन उराडे, नगरसेवक महेश भर्रे, नगरसेवक हितेंद्र राऊत, नगरसेविका सरीताताई पारधी, नगरसेविका लताताई ठाकूर, नगरसेविका सुनिताताई तिडके, गटनेता मनोज वठे, नगरसेविका अंजलीताई उरकुडे, नगरसेविका सपनाताई खेत्रे, नगरसेविका पुष्पाताई गराडे ह्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरोग्य निरीक्षक आर.एस. ठोंबरे यांनी केले.
यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.