Home गडचिरोली नवभारत व नवराष्ट्र वृत्तपत्र समुहाच्या वतीने नवभारत पॉवरफुल वूमन 2022 पुरस्काराने  गीता...

नवभारत व नवराष्ट्र वृत्तपत्र समुहाच्या वतीने नवभारत पॉवरफुल वूमन 2022 पुरस्काराने  गीता हिंगे  नागपुरात सन्मानित

98

 

गडचिरोली/ नागपुर :-  सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या गीता हिंगे यांना निष्पक्ष नवभारत व नवराष्ट्र वृत्तपत्र समुहाच्या वतीने नवभारत पॉवरफुल वूमन 2022 पुरस्काराने दि. 27-11-22 रोजी नागपूर येथे हॉटेल तुली इंपेरियल येथे आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रसिद्ध सिने अभिनेत्री किशोरी शहाणे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदारी, आयपीएस अधिकारी अस्वती दोरजे ज्या एके काळी गडचिरोली मध्ये होत्या, एम्स च्या डायरेक्टर विभा दत्ता,इन्स्टिटयूशन ऑफ सायन्सच्या डायरेक्टर डॉ. अंजली रहाटगावकर, सुप्रीम कोर्टाच्या ऍडव्होकेट नुपूर धमिजा, आरोग्य विभागाच्या डेप्युटी डायरेक्टर डॉ विनिता जैन, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गीता हिंगे यांचा सन्मान करण्यात आला.

गीता हिंगे यांनी आधारविश्व फाऊंडेशन महिलांची संस्था स्थापन करून या फाऊंडेशन च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले.विधवांना समाजात सन्मान मिळावा म्हणून दरवर्षी त्यांच्या सोबत मकरसंक्रांत साजरी करणे, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी अति दुर्गम भागात जाऊन गरजुंना मदत करणे, कोरोना काळात लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या 400 ते 500 लोकांना महिना भर पुरेल इतक अन्न धान्य व जीवनावश्यक साहित्य पुरविणे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना 2 महिने 200 मोफत टिफिन सेवा पुरविली या मध्ये आधारविश्व फाउंडेशन ,(ज्याच्या अध्यक्षा गीता हिंगे आहेत ) च्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले ,एवढेच नाही तर कोरोनाने मृत पावलेल्या ज्या रुग्णांचे नातेवाईक अंतिम संस्कार करायला तयार नव्हते अशा कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींना स्वतः स्मशानघाटात जाऊन अग्निडाग दिला. असे अनेक समाजोपयोगी उपक्रम गीता हिंगे यांनी राबविले. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन नवभारत वृत्तपत्र समुहाच्या वतीने पॉवरफुल वूमन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले

Don`t copy text!