लोकनेता बलीराम यादव यांच्या 20 वी पुण्यतिथीनिमित्त विविध ठिकाणी अभीवांदन
जालना – शहर बेघर झोपडपट्टीचे संस्थापक सचिव लोकनेता कै. बलीराम यादव यांच्या 20 व्या पुण्यतिथी निमित्त नगरपालिकाच्या वतीने लोकनेता बलीराम यादव यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.जवाहर बाग येथील लोकनेता कै बलीराम यादव यांच्या मार्ग फलकास पुष्पहार अर्पण करून अभिवांदन करण्यात आले.
तर यादव अहिर संघ व्दारा संचालित श्रीकृष्णा हिंदी विघ्या मंदीर कन्हैयानगर येथे प्रतीमेस पुष्पहार घालुन अभींवादन करण्यात आले.लोकनेता कै.बलीराम यादव यांच्या कार्याचा आढावा घेतला.प्रस्तावना मांडताना रवींद्र बनसोडे यांनी सांगितले की शहर बेघर झोपडपट्टी युनीयनचा माध्यमातून 22 झोपडपट्टया बसवुन निवारा दिला.भीम नगर,गांधीनगर , रामनगर, गुरू गोविंदसिंग नगर, संग्रामनगर,लक्कडकोट, हनुमान घाट,खांंडसरी, चंदनझीरा, कन्हैय्यानगर,क्रांतीनगर, क्रिस्ती कॅम्प, बालाजी नगर,बलराम नगर, रमाबाई नगर,आदी बसविलेल्या आहेत.त्यांना प्रवाह मध्ये आणण्यासाठी नगर परिषदेच्या दलीतवस्ती सुधार योजने सर्वात प्रथम 14 दलीतवस्त्या घोषीत करुन घेतले.त्यांना पिआरकार्ड देण्याची मागणीसाठी विशाल मोर्च काढले.शासन दरबारी सतत तगादा लावला होता. त्याआधारे भुमीअभिलेख विभागामार्फत दोनदा सर्वे करून घेतले.शासनाने मोजमाप ही केले जेव्हा झोपडपट्टया बसल्या तेव्हाचे शेत सारा कर आकारणी करण्यात यावी त्याचा मोबदला भरण्याची तयारी दर्शवली होती.
परंतु आज पर्यंत ही मागणी पुर्ण झाली नाही ते स्वप्न त्यांची मुले अभयकुमार यादव व विनोद यादव हे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून पुर्ण करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी दलितमित्र सावित्रीबाई पगारे, काशीनाथ साळवे,भिक्कनभाई परसुवाले, अभयकुमार यादव विनोद यादव,आर पि निकस रविंद्र बनसोडे, शिवाजी दाभाडे,चव्हाण सर,बबलुसेठ क्षीरसागर,मनोज गवळी,गंगातीवरे,पोपट राऊत,प्रभाकर बोर्ड,आदींची उपस्थिती होती




