जनतेच्या कल्याणासाठी काम करण्याची शक्ती मिळू दे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त मार्कंडेश्वराला घातले साकडे
*आपल्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ देवराव जी होळी यांनी विदर्भाची काशी मार्कंडादेव येथे जाऊन मार्कंडेश्वराला नमन करीत भगवान शंकराची मनोभावे पूजा केली व आशीर्वाद घेतले*
*दिनांक १०/१२/२०२२*
*१० डिसेंबर आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा जन्मदिवस आपल्या जन्मदिनानिमित्त आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी सकाळीच मार्कंडेश्वराचे सपत्नीक दर्शन घेतले व भगवान शंकराची पूजा केली. जनकल्याणाच्या कामासाठी शक्ती दे अशी मागणी त्यांनी यावेळी भगवान मार्कंडेश्वराला केली.*
*याप्रसंगी तालुक्यातील प्रमुख भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते*
*आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या जन्मदिवसानिमित्त गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या पूर्वीच सकाळीच मार्कंडादेव येथे जाऊन भगवान मार्कंडेश्वराचे त्यांनी दर्शन घेतले व जनकल्याणाची कामना केली.*






