चीचडोह बॅरेज येथे शेती अधिग्रहण झालेल्या शेतकऱ्यांचा निधीचा प्रश्न नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी लावला मार्गी
*चीचडोह बॅरेज येथील जमीन अधिग्रहण करिता ६ कोटी रुपये मंजूर!……*
*दिनांक १३ डिसेंबर २०२२*
*चामोर्शी येथील शेकडो कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या चिचडोह ब्यारेज येथे तालुक्यातील शेकडो शेतकरी यांचे शेतजमीन बॅरेज प्रकल्पात गेली आहे, सदर जमीन राज्य सरकारने अधिग्रहण केली होती*
*व काही शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक मोबदला मिळाला होता व काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नव्हता ,परंतु सदर अधिग्रहण करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला देण्याचा विषय महाविकास*
*आघाडी सरकार आल्यानंतर थंड बस्त्यात गेले होते, त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन या विषयावर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांचे* *मार्गदर्शनात येथील नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी मंत्रालय मुंबई येथे अविरत*
*राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला व उपमुख्यमंत्री महोदय यांनी तत्काळ कारवाई करून आपले खाजगी सचिव यांना तत्काळ निधी मंजूर करण्याचे लेखी निर्देश दिले व तसे सूचना जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांना चीचडोह बॅरेज येथील जमीन अधिग्रहण करून उर्वरित शेतकरी यांना जमिनीचा*
*मोबदला निधी ६ कोटी रुपये मंजूर केले, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पात गेली आहे व त्यांना जमिनीचा अजूनही मोबदला मिळाला नाही त्यांनी नगरसेवक आशीष भाऊ पिपरे व सोशल मीडिया संयोजक रमेश अधिकारी*
*यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन या प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे*
*सदर अधिग्रहित जमिनीचा मोबदला येथील शेतकरी* *बांधवांना मिळवून दिल्याबद्दल*
*खासदार अशोक भाऊ नेते,* *नगरसेवक आशीष भाऊ पिपरे सोशल मीडिया संयोजक रमेश अधिकारी यांचे आभार मानले*






