दोन मुलींचे अपहरण करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. एक आरोपी फरार

158

दोन मुलींचे अपहरण करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. एक आरोपी फरार

प्रेम प्रकरणातून केले अपहरण

भद्रावती – तालुक्यातील मोहबाळा व शहरातील शिवाजीनगर इथून दोन अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल होती भद्रावती पोलिसांनी या घटनेचा छडा लावत दोन अल्पवयीन मुलीला बिहार राज्यातून सुखरूप घरी आणले असून एक आरोपी ला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
यातील धर्मेन्द्र कुमार गणेश तांती वय 22 वर्ष राहणार ग्राममजवे जिल्हा जमुई बिहार या आरोपीला अटक करण्यात आली असून प्रथम कैलास वानखेडे वय 21 राहनार शिवाजीनगर भद्रावती असे फरार आरोपीचे नाव आहे. धर्मेंद्र हा गेल्या दहा वर्षापासून भद्रावती परिसरात मोल मजुरीचे काम करीत होता त्याने आपला मित्र प्रथमेश याच्या मदतीने 16 व 17 याअल्पवयीन मुलीसोबत दोघांचे प्रेम संबंध जुळले यात या दोघांनी या मुलींना लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून त्यांचे अपहरण करून त्यांना बिहार राज्यात नेण्यात आले . दिनांक 2 जानेवारीपासून अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल झाली होती घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुप्तचर माहितीवरून तसेच मोबाईलच्या लोकेशन वरून नक्षल भागात असलेल्या बिहार राज्यात जाऊन आरोपी सह दोन्ही मुलींना ताब्यात घेतले आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुदरी, सुषमा पवार, छगन जांभुळे सायबर सेल चंद्रपूर यांनी केली