ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग अहेरी येथे 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा
74th Republic Day Celebration at Rural Water Supply Sub Division Aheri
अहेरी :ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद गडचिरोली उपविभाग अहेरी येथे 74 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण उपविभागीय अभियंता ए. जीभकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमा ला ग्रामीण पाणी पुरवठा चे अभियंता ए. रामटेके, श्री. पि. डी. झाडे, पि.मेश्राम, उपविभागीय समन्व्यक(पाणी गुणवता)श्री देवानंद सुरपाम, कनिष्ठ अभियंता कु. नीलिमा कन्नाके, श्री. मयूर जोरीगलवार, कनिष्ठ सहाय्यक कृष्णा कंदोटीवार, खोब्रागडे, व्हालमान ए. मंथनवार, श्री रमेश दोंतुलवार, परिचर ज्योती नैताम उपस्थित होते. यावेळी भारतीय संविधान चे प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.