जिल्हा कांग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय पंदिलवार यांनी भारतीय जनता पार्टीत कार्यकर्त्यांसोबत केले पक्ष प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत

76

जिल्हा कांग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय पंदिलवार यांनी भारतीय जनता पार्टीत कार्यकर्त्यांसोबत केले पक्ष प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत

 

*आष्टी – इल्लूर जिल्हा परिषद क्षेत्रात कांग्रेसला मोठे खिंडार*

 

 

गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय पंदिलवार यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

 

शिक्षक मतदार संघाच्या प्रचाराकरीता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गडचिरोली येथे आले आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा घालून संजय पंदिलवार यांचे स्वागत केले यावेळी खा. अशोक नेते, आ. डॉ देवराव होळी, माजी आमदार अम्ब्रिशराव आत्राम, जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, रविंद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, आदि मान्यवर उपस्थित होते.

 

संजय पंदिलवार हे आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजपात प्रवेश केल्याने आष्टी परीसरात कांग्रेस ला मोठे खिंडार पडले आहे. यावेळी देवराव नामेवार, सदाशिव तेलकुंटवार, पंकज येलमूले, रवि बामनकार, अनूप सिंग, प्रदिप मडावी, साहिल आकरेडीवार,समिर कारकुरवार,भिकाजी बोरकुटे, शरद बामणवाडे,सुरज दुर्गे, यांच्या सह चाळीस ते पन्नास कार्यकर्ते उपस्थित होते

संजय पंदिलवार यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी माझ्या स्वइच्छेने भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला असुन आणखी पुन्हा काही दिवसात आष्टी परिसरातील हजारो कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करवून घेणार आणि आजपर्यंत मी करीत आलेले गोरगरीबांचे काम करीत राहणार असे बोलतांना सांगितले व आष्टी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आष्टी येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संजय पंदिलवार यांचे फटाके फोडून जंगी स्वागत पंदिलवार केले यावेळी पंदिलवार यांनी बोलताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला व पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची गंगा घरोघरी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले