कृष्णनगर इस्कॉन चामोर्शी येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह. माजी नगरसेवक प्रमोद पिपरे व माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांचा सहभाग
गडचिरोली :- दि. 6 फेब्रुवारी
*आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन चामोर्शी च्या वतीने श्री श्री राधा श्यामसुंदर मंदिर कृष्णनगर येथे दि. 5 ते 12 फेब्रुवारी पर्यन्त श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे काल दि. 5 फेब्रुवारी रोजी या भागवत सप्ताहाची सुरुवात करण्यात आली यावेळी इस्कॉन चे आजीवन सदस्य तथा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे तसेच अनिल बालपांडे व एगलोपवार कुटुंबीय यांनी भागवत कथा ज्ञानयज्ञ मध्ये सहभाग घेऊन पूजा अर्चना केली व होम हवन करून विधिवत पूजा केली. यावेळी कृष्णनगर परिसरातील गावामधील भाविक व बंगाली समाज बांधव मोठ्या प्रमाणावर भागवतात सहभागी होऊन होम हवन मध्ये सहभागी होऊन पुजा- अर्चा केली*
*या भागवत कथा सप्ताहात भागवत प्रवक्त्ता म्हणून गुजरात चे परमपूज्य श्री कुंडलकृष्ण प्रभुजी महाराज उपस्थित राहून भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत. या भागवत सप्ताहात चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भाविक व कृष्णभक्त मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. जास्तीतजास्त भाविकांनी या भागवत कथा सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन, चामोर्शी चे अध्यक्ष परमेश्वर दास यांनी केले आहे.*






