फुरसुंगी भेकराईनगर उरुळी देवाची परिसरासाठी सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेले 100 बेड चे अद्यावत हॉस्पिटल उभारावे भाजपची मागणी

66

फुरसुंगी भेकराईनगर उरुळी देवाची परिसरासाठी सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेले 100 बेड चे अद्यावत हॉस्पिटल उभारावे भाजपची मागणी

फुरसुंगी भेकराईनगर उरुळी देवाची हा भाग कचरा डेपो बाधित आहे हवा पाणी प्रदूषित असल्या कारणाने येथील स्थानिक जनता अनेक वैद्यकीय समस्यांनी ग्रासलेले आहेत तसेच फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्र हे जिल्हा परिषदेकडे असल्याने हा भाग पुणे मनपात समाविष्ट झाला आहे तसेच या ठिकाणची कर्मचारी संख्या अपुरी आहे आपण याबाबत योग्य निर्णय घेऊन फुरसुंगी भेकराईनगर उरुळी देवाची परिसरासाठी सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेले 100 बेड चे इमर्जन्सी सर्विसेस, ओपीडी, औषधे, लॅब, ईसीजी, एक्स-रे , सोनोग्राफी, ऑक्सीजन ,व्हेंटिलेटर ,ऑपरेशन थिएटर अशा अद्यावत सुविधा असलेले हॉस्पिटल उभारणे साठी निधी उपलब्ध करून द्यावा व फुरसुंगी गाव गांधनखळा , फुरसुंगी तुकाई टेकडी किंवा उरुळी देवाची मंतरवाडी येथे हे अद्यावत हॉस्पिटल उभारावे सोबत येथील जागेचे सातबारे जोडत आहे तसेच नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांना दिलेले पत्र, आरोग्य सेवा आयुक्तालय महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे सहाय्यक संचालक आरोग्य सेवा राज्यस्तर मुंबई डॉ. शोभना तेहरा यांचे पत्र देखील जोडत आहे आपण डीपीडीसी चा ठराव व आपले शिफारस पत्र जोडून तसेच सर्व अधिकाऱ्यांना या विषयात सूचना देऊन तातडीने कारवाई करून हा हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावून येथील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी नामदार चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री पुणे जिल्हा तसेच माननीय पवार साहेब उपसंचालक आरोग्य सेवा,

पुणे मंडळ यांच्याकडे पुणे धनंजय आप्पा कामठे

अध्यक्ष भाजपा मध्य हवेली तालुका, मंगेश जाधव सरचिटणीस भाजपा मध्य हवेली तालुका,

संदीप परदेशी

सरचिटणीस युवा मोर्चा मध्य हवेली तालुका यांनी केली आहे