138

गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा

गोंदिया :- दि. 27 जाने.
गोंदिया जिल्ह्यातील अनेक विकास कामे मागील 1 वर्षापासून कोविड-19 च्या लॉकडाऊन काळापासून प्रलंबित आहेत. ते सर्व कामे मार्च च्या पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिल्या . तसेच नवीन प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन समिती गोंदियाची आढावा बैठक आज दि 27 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली.

आढावा बैठक राज्याचे गृहमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. अनिलजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला प्रामुख्याने गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल, विधान परिषदेचे आमदार परीणयजी फुके, आम. सहसराम कोरेटी, आम विजय रहांगडाले, आम. मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, व सर्व प्रमुख अधिकारी, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.