*शासनाच्या योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या कामांची चौकशी करा*
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे निर्देश*
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे अध्यक्षतेखाली धानोरा तालुक्याची वार्षिक आमसभा संपन्न*
*मुख्यमंत्री /प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे, पाणीपुरवठा योजनेची कामे, घरकुल यासह विविध योजनांच्या कामांच्या संदर्भात दिले चौकशीचे आदेश*
*दिनांक 16 फेब्रुवारी 2023 गडचिरोली*
*राज्य शासन जनकल्याणाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवविण्यात यासंदर्भात निर्णय घेत आहे. मात्र प्रशासन जनतेच्या कल्याणाच्या या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करीत नसल्याचे निदर्शनास येत असून योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी न करणाऱ्या न होणाऱ्या कामांची व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची तातडीने चौकशी करण्यात यावी असे निर्देश आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी धानोरा येथील वार्षिक आमसभेच्या प्रसंगी दिले.*
*यावेळी मंचावर धानोरा चे तहसीलदार तहसीलदार वीरेंद्रजी जाधव, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी श्री टीचकुले , भाजपाचे तालुक्याचे अध्यक्ष शशिकांत जी साळवे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, माजी जिल्हा परिषद सदस्य लताताई पुंघाटी ,विनोद लेनगुरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजबे , यांचे सह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.*
*यावेळीची आमसभा विविध विषयांनी प्रचंड गाजली. स्थानिकांनी आपापल्या समस्या सोडवण्यासाठी आमदार महोदय यांना निवेदन देत आपल्या समस्या मांडल्या. त्या समस्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश या आमसभेच्या प्रसंगी आमदार महोदयांनी दिल्याने आलेल्या नागरिकांचे समाधान झाले.*
*ज्या लोकांना खरोखरच घर नाही अशा लोकांना अजूनही घरकुल मिळाले नाही. मात्र ज्यांना घर आहे त्यांना घरकुल देण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची आवश्यकता असल्याने त्यांनी याप्रसंगी तसे निर्देश दिले . प्रत्येक गावामध्ये हर घर जल या मिशन अंतर्गत पुरवण्याचे शासनाचे निर्देश आहेत. माञ त्या योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याचेही निदर्शनास येत असल्याचे त्यांनी म्हटले. प्रत्येक गावाला जोडण्यासाठी मा. पंतप्रधान व मा.मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली असून रस्त्यांचे कामे झाली तर विकासाला मदत मिळेल दुर्गम भाग तालुक्याच्या ठिकाणी लवकर जोडले जाईल. त्यातून दळणवळणाच्या विविध समस्या सुटण्यास मदत होईल .मात्र ती काम सुद्धा योग्य प्रकारे सुरू नसल्याचे दिसते त्यामुळे या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी व त्या संदर्भातील अहवाल मला अवगत करण्यात यावा असे निर्देश त्यांनी याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.*



