Home गडचिरोली *गडचिरोली शहर येथील मुख्य तलावाचे सौंदर्यकरण करण्यात यावे* अल्पसंख्यांक कांग्रेस शहराध्यक्ष जावेद...

*गडचिरोली शहर येथील मुख्य तलावाचे सौंदर्यकरण करण्यात यावे* अल्पसंख्यांक कांग्रेस शहराध्यक्ष जावेद खान गडचिरोली यांची मागणी

78

*गडचिरोली शहर येथील मुख्य तलावाचे सौंदर्यकरण करण्यात यावे* अल्पसंख्यांक कांग्रेस शहराध्यक्ष जावेद खान गडचिरोली यांची मागणी…

गडचिरोली शहरातील मध्यभागी असलेले मुख्य तलावाचे सौंदर्यकरण करण्यासाठी वेळोवेळी लोकांनी ,मागणी करुनही तलावाचे थातुरमाथुर काम करुन बंद करण्यात आले.

तलाव हे मध्यभागी असुन सौंदर्यकरण न झाल्यामुळे,शहरातील सांडपाणी तलावात जातो.त्यामुळे तलावाच्या बाजुला जे वसाहत आहे,त्यांना अस्वच्छतेमुळे मच्छर सांडपाणी गंदगी ,डुक्करांचा त्रास सहन करावा लागत आहे.तरी या तलावाचे सौंदर्यकरण झाले तर,या समस्या दुर होवुन,शहरातील लोकांना फिरायला एक स्थळ उपलब्ध होईल.त्यामुळे प्रशासनाने,याकडे मागणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे करावे.अशी मागणी कांग्रेस पदाधिकारी अपर्णाताई खेवले,आशाताई मेश्राम,माजिद सैयद ,घनश्याम वाढई,प्रफुलभाऊं आंबोरकर,रुपेशभाऊं नांदनकर व आशिष वाढई तसेच शहरातील लोकांनी मागणी केली आहे.

आपला विश्वासु:- जावेद खान

अल्पसंख्यांक कांग्रेस शहराध्यक्ष गडचिरोली.

Don`t copy text!