दक्षिण गडचिरोली भागात नक्षल्याकडून पुन्हा जाळपोळ एटापल्लीत तालुक्यातील रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ पुरसलगोंदी-अलेंगा मार्गावरील घटना

52

दक्षिण गडचिरोली भागात नक्षल्याकडून पुन्हा जाळपोळ

एटापल्लीत तालुक्यातील रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ

पुरसलगोंदी-अलेंगा मार्गावरील घटना

 

 

 

 

 

गडचिरोली: वृत्तवाणी

 

गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात नक्षलवाद्यांनी आपल्या कारवाया पुन्हा सुरू केल्या आहेत.गुरुवारी रात्री एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी अलेंगा मार्गावरील दामिया नाल्याजवळ नक्षलवाद्यांकडून पुलाच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली.

 

गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास पुरसलगोंदी – अलेंगा मार्गावर सुरू आलेल्या पुलाच्या बांधकामस्थळी उभे असलेल्या वाहनांना नक्षलवाद्यांनी पेटवून दिले. यात 1 जेसीबी,1पोकलॅन आणि 1मिक्सरमशीनचा समावेश आहे. यावेळी 15 ते 20 सशस्त्र नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच भामरागड तालुक्यातील विसामुंडी मार्गावर देखील एका वाहनाची जाळपोळ करण्यात आली होती. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पुन्हा एकदा दक्षिण गडचिरोली भागात नक्षलवादांचा जाळपोळ कारवाईला वेग आली असून नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा दहशती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे

दोन दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात देखील रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती.