गॅस दर वाढीच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीने केंद्रातील भाजप सरकारचा केला निषेध..शेकडो महिलांची उपस्थिती
गडचिरोली…काही वर्षा पूर्वी केंद्रात काँग्रेस शासन असताना च्या काळात साडेतीनशे रुपये चे गॅस सिलेंडर मिळत होते परंतु केंद्रात भाजपा चे सरकार आल्या पासून महागाई सपाट्याने वाढण्यास सूरवात झाली खाण्याचे तेला चे भाव वाढले पेट्रोल डिझलचे चे भाव वाढले वाढत्या महागाई मुळे सर्व साधारण लोकांचे जगणे कठीण झाले आहे महागाई मुळे भाजपने गरीब लोकांना सडो की पळो करून सोडले आहे यातच काल परवा गॅस वर परत 50 रुपयांनी वाढ केली सुरवातीला उजवला गॅस गोर गरिबांना मोफत दिले नंतर 500 रू किंमत ने गॅस दिलेआता उज्वला योजने वाल्यानही 1100 रुपये द्यावे लागते गॅसच्या वाढत्या भाव मुळे अनेक महिलांनी गॅस वर सव्यंपक करणे सोडून लाकूड जाळून स्टोव वर स्वयंपाक करणे सुरू केले आहे गॅस वर वाढवालेल्या किमतीच्या विरोधात शिवसेना महिला आघाडी संघटीका छाया ताई कुंभारे यांच्या नेतृत्वात गांधी चौक गडचिरोली येथे शेकडो महिलांच्या उपस्थितीत केंद्रातील भाजप सरकारच निषेध केला केंद्र शासन मुर्दाबाद चे नारे लावण्यात आले या प्रसंगी छाया ताई कुंभारे यांनी म्हटले केंद्रातील या भाजप सरकारने नेहमी नेहमी महागाई वाढवून आम्हा महिलांचे जिने हराम केले आहे कसबा.चीचवड ची निवडणूक पाहून तसेच कोणतीही निवडणूक पाहून भाव कमी करायचे आणि निवडणूक नंतर दुपटीने वाढवायचे हे भाजप सरकारचे धोरण आहे येत्या काळात पूनच भाव वाढ करण्यात आली तर शिवसेना महिला आघाडी या पेक्षा ही तीव्र आंदोलन करेल निषेध प्रसंगी छाया ताई कुंभारे महिला संघाटीका जोत्सना राजूरकर नूतन कुंभारे देवकी कंकड्यालवार आरती खोब्रागडे रिंकू वासलवार संध्या हेमके रीहानी दीक्षित माधुरी राजूरकर सुलभा राजूरकर रेखा कुमरे यामिना आलाम सपना मेश्राम संगीता रामटेके अपूर्वा कटकवार शिरसागर ताई वैशु ताई व शेकडो महिला शिवसैनिक उपस्थित होते