डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारपासून करमाळा, जि. सोलापूर येथे सलग तीन दिवस मोफत आरोग्य शिबिर

55

*डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारपासून करमाळा, जि. सोलापूर येथे सलग तीन दिवस मोफत आरोग्य शिबिर*

 

*मोफत औषधाचे व मोफत चष्म्याचे वाटप,मोफत ECG , मोफत नेत्र तपासणी, महिलांची कॅन्सर तपासणी*

 

*शिबिरात निदान झालेल्या सर्व नागरिकांची पूर्णतः मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत अँजिओप्लास्टी – बायपास शस्त्रक्रिया*

 

*करमाळा, सोलापूर /प्रतिनिधी/*

 

करमाळा शिवसेनेचे वतीने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 5 मार्च 6 मार्च व 7 मार्च 2023असे 3 दिवस मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये औषधे व चष्मे मोफत दिले जाणार असून या आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.

 

या शिबिराचे उद्घाटन जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, आणि अक्कलकोटचे आमदार श्री सचिन कल्याणशेट्टी हे करणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार नारायण पाटील राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड दत्तकला शिक्षण संस्थेचे चेअरमन रामदास झोळ राहणार आहेत.

 

आरोग्य शिबिरात मोफत इसीजी तपासणी, महिलांच्या गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी, हृदयरोग तपासणी सर्व रोग निदान शिबिर डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे.

 

हे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख देवानंद बागल शहर प्रमुख संजय आप्पा शीलवंत युवा सेनेचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख विशाल गायकवाड महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रियंका ताई गायकवाड शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख दीपक पाटणे सह कक्ष प्रमुख शिवकुमार चिवटे कोळगाव शाखाप्रमुख नागेश शेंडगे उपशहर प्रमुख नागेश गुरव राजेंद्र काळे रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण वैद्यकीय सहाय्यक प्रमुख मुंबई रोहित वायबसे प्रदीप बनसोडे संजय जगताप आधी प्रयत्न करत आहेत.

 

या शिबिरात साईदीप हॉस्पिटल अहमदनगर आनंद ऋषी हॉस्पिटल अहमदनगर नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल बार्शी उपजिल्हा रुग्णालय करमाळा ज्युपिटर हॉस्पिटल मुंबई या ठिकाणचे प्रसिद्ध डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत.

 

*हे आरोग्य शिबिर करमाळा येथील नियोजित स्वातंत्र्यसैनिक कै मनोहरपंत चिवटे रुग्णालय येथे असलेल्या श्री कमला भवानी ब्लड बँक सेंटर येथे होणार आहे.*