*जिल्ह्यातील तासिका मानधन शिक्षकांची होळी मानधना अभावी रंगहीन.
* गडचिरोली जिल्हा परिषद मार्फत एकुण दहा हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय चालविले जात आहे, पैकी एकुण आठ शाळेत शिक्षक परिपूर्ण नसल्याने तासिका तत्वावर अगदी तात्पुरत्या स्वरुपात शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. परंतु सत्र संपण्याच्या स्थितीत आले असून सुद्धा अजून पर्यंत एकाही महिण्याचे मानधन मिळाले नाही, बिचाऱ्या तासिका मानधन शिक्षकांनी आपल्या संसाराचा गाडा कसा चालवायचा हाच मोठा यक्ष प्रश्न आहे. तासिका मानधन शिक्षकांनी वारवांर शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे विचारणा केली परंतु काही तरी थातुर मातुर उत्तर देऊन फक्त आशेवरच ठेवत आहेत. जानेवारी महिन्यात या शिक्षकांनी कामबंद आंदोलन केले होते, तेव्हा येत्या पंधरा दिवसात तुम्हाला मानधन दिले जाईल , तुमचेच काम चालू आहे, असे सांगून आंदोलन मागे घ्यायला लावले. आज दिड महिना झाला आहे तरी सुद्धा शासन व प्रशासन झोपलेलेच आहेत. जर याच अधिकाऱ्यांचे आणि पदाधिकारी यांचे वेतन एक महिना जरी झाले नसते तर हे शांत बसले असते का? असा प्रश्न तासिका मानधन शिक्षकांनी केला आहे. या गृपवर सर्वच क्षेत्रातील विचारवंत व्यक्ती आहेत, पत्रकार आहेत यांना एवढीच विनंती आहे की, हि माहिती ई.ओ आणि सि.ई.ओ. यांचे पर्यंत पोहचली पाहिजे. आणि लवकरात लवकर तासिका मानधन शिक्षकांचे मानधन मिळाले पाहिजे.






