बल्लारपूर नगरपरिषदेच्या जनविरोधी नितिच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

142

 

बल्लारपूर नगरपरिषदेच्या जनविरोधी नितिच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आले.

चंद्रपूर:- बल्लारपूर नगर परिषदेच्या मनमानी कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात नगरपरिषद कार्यालय बल्लारपूर समोर असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन नारेबाजी करीत धरणे आंदोलन करण्यात आले.
बल्लारपूर नगरपरिषदेने उपयोगिता कराच्या नावाने सरसकट ३६० रुपये आकारले आहे. या अगोदर घनकचरा व्यवस्थापन १३ व्या व १४ व्या वित्त आयोगाच्या योजना निधीतून तसेच घनकचरा व्यवस्थापनातून खत निर्मिती, प्लास्टिक व अन्य विकाऊ योग्य सामग्रीतुन इतर खर्च करण्यात येत होता. नागरिकांना याअगोदर विशेष स्वच्छता कर योग्य मूल्याचे १ टक्के कर आकारण्यात येत होता. परंतु आता नगरपरिषदेने उपयोगिता कराच्या नावाने एकत्रित मालमत्ता कर १३२ रुपये आहे. परंतु आता वार्षिक सरसकट ३६० रुपये वाढवल्याने येथील जनतेला परवडण्यासारखे नाही. यामुळे बल्लारपूर येथील जनतेची आर्थिक लूट होत असून ही लूट थांबवण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी केली.
भविष्यात मोठा भ्रष्टाचार होऊ नये करिता नव्याने निविदा काढण्याची मागणी सुद्धा धरणे आंदोलनात करण्यात आली. सदर धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. तीव्र नारेबाजी करत नगरपरिषदेच्या मनमानी कारभारा विषयी वंचित बहुजन आघाडी ने आक्रोश व्यक्त केला. वरील मागणी तात्काळ पूर्ण झाली नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करणार असा इशारा वंचित बहुजन आघाडी करून देण्यात आला. धरणे आंदोलनात सहभागी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजूभाऊ झोडे, संपत भाऊ कोरडे, सचिन पावडे जॉकिर खान उमेश कडू, भूषण पेटकर, सतिश करमरकर, नरेंद्र सोनारकर, अतुल भडके, पंचशील तामगाडगे, भंगतसिंग झगडे ,नविन डेविड, विश्वास तेलंग,अनिरुप पाटिल, प्रकाश देवगडे, कविताताई गौरकार, सत्यभामा भाले, वंदनाताई तामगाडगे,विश्वास देशभ्रतार, अभय गौर तथा वंचित बहुजन आघाडीचे असंख्य कार्यकर्ते धरणे आंदोलनास उपस्थित होते.