कॅन्सरग्रस्त रुग्णांना माजी मंत्री,विद्यमान आमदार श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दिला आधार

87

*कॅन्सरग्रस्त रुग्णांना माजी मंत्री,विद्यमान आमदार श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दिला आधार*

 

*सावली[ता.प्र]*

*दिनांक: १७ मार्च२०२३*

 

स्थानिक वॉर्ड क्र.१५ येथील श्री.मिलिंद वाळके हे कॅन्सरग्रस्त व आजारी असल्याची बातमी प्राप्त झाली तसेच वॉर्ड क्र.६ येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण पुरषोत्तम दसरावार हे अल्पावधीतच मृत पावले, त्यांचा पाठीमागे पत्नी मुले बराच आप्त परिवार आहे.

 

जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा माणून माजी मंत्री,विद्यमान आमदार श्री. विजयभाऊ वडेट्टीवार हे कॅन्सरग्रस्त,गरीब लोकांना आर्थिक मदत करतात.

 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुकाध्यक्ष नितिन गोहने यांनी तात्काळ माजी मंत्री,व विद्यमान आमदार लोकनेते श्री.विजयभाऊ वडेट्टिवार यांच्याशी संपर्क साधुन सावली शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष विजय मुत्यलवार , नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे व उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार यांच्या हस्ते कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत देण्यात आली.

 

मदत देतांना नगरसेवक प्रफुल वाळके, गुणवंत सुरमवार,सचिन सांगिडवार,अंतबोध बोरकर, नगरसेवीका साधना वाढई,अंजली देवगडे, ज्योती शिंदे,ज्योती गेडाम,सिमा संतोषवार, प्रियंका रामटेके तसेच सावली तालुका सोशल मीडिया अध्यक्ष कमलेश गेडाम, बादल गेडाम या वेळी उपस्थित होते.