*भूमी अभिलेख तयार करतांना पारदर्शक सर्वेक्षण करा- राघवेंद्र सुल्वावार सभापती बांधकाम न.पं. एटापल्ली*
दिनांक १० मार्च २०२३ रोजी भूमी अभिलेख कार्यालयाने ड्रोन द्वारे सर्व्हे केलेला आहे.याचा मुख्य उद्देश असा आहे की,गावकऱ्यांचा घरांची-जागेची मालकी निश्चित करण्यासाठी केंद्रीय राज मंत्रालयाने विशेष उपक्रम राबवून “सर्व्हे ऑफ इंडिया” कडून सर्व्हेक्षणाचे कार्य सुरू असून मुंबईतील “आरव अनमॅन्ड सिस्टम” ही कंपनी करीत असून ग्रामीण भागात मालमत्तेची स्पष्ट मालकी प्रस्थापित करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून मॅपिंग करण्यात येत आहे व जागेच्या मालकांना कायदेशीर मालकी जारी करून मालकांना प्रॉपर्टी कार्ड(आखीव पत्रिका) प्रदान करावयाचे आहे व या माध्यमातून विविध पैलूंचा समावेश केलेला आहे.ज्यात मुद्रिकरण सुलभ करणे,बँक कर्ज सक्षम करणे,शहरातील जागेचा वाद नाहीसा करणे इत्यादी.
ह्या संपूर्ण बाबीचा नागरिकांना पुरेपूर फायदा व्हावा ह्याकरिता भु-मापन सर्व्हेक्षण करतांना निवड ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण ग्राह्य न धरता प्रत्येक्ष घरो-घरी जाऊन आपल्या यंत्रणेकडून सर्व्हेक्षण केल्यास उचित राहील.काही प्रभागात मूळचे रहिवासी असून सुरुवाती पासून घर असतांना सुद्धा अद्याप पावतो त्यांचा नावाचा प्रॉपर्टी कार्ड(आखीव पत्रिका) तयार करण्यात आलेला नाही असेही उदाहरणे आहेत.तेव्हा कोणताही नागरिक शासकीय योजनेपासून जसे घरकुल,शौचालय व इतर योजनांपासून वंचित राहता काम नये.
ह्याकरिता आपल्या स्तरावर सर्व्हेक्षण करण्यात येऊन आम्हाला व वंचित न राहणाऱ्या नागरिकांना उपकृत करावे अशी मागणी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्वावार, नगरसेवक राहुल कुळमेथे, तनुज बल्लेवार, संजय रामटेके, संदीप जंबोजवार यांनी केली आहे.