सेवाग्राम एक्स्प्रेस आणि बल्लारशहा गोंदिया पॅसेंजर सुरू करा
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री 🔹संजीव मित्तल यांना कामगार मोर्चाचे निवेदन
चंद्रपूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री संजीव मित्तल यांनी आज शुक्रवारी चंद्रपूर आणि बल्लारपूर येथे भेट दिली. यावेळी भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आणि रेल्वे प्रवासी सुविधा समितीचे अध्यक्ष अजय दुबे यांनी त्यांना सेवाग्राम एक्स्प्रेस आणि बल्लारशहा गोंदिया पॅसेंजर सुरू करा या सह विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतले यांची उपस्थिती होती.
महाव्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात, पिटलाईनचे काम लवकरच पूर्ण करावे, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि बल्लारशहा गोंदिया पॅसेंजर लवकरच सुरू करावे, सेवाग्राम एक्सप्रेसची मुंबई प्रवासाची वेळ बदलण्यात यावी आणि बल्लारशाह जीआरपी चौकीचे कामकाज सुधारीत करावे आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री संजीव मित्तल यांनी या सर्व विषयांवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.






