Home गडचिरोली आधारविश्व फाऊंडेशन तर्फे गुडिपाडव्याला महिलांची भव्य रॅली

आधारविश्व फाऊंडेशन तर्फे गुडिपाडव्याला महिलांची भव्य रॅली

98

*आधारविश्व फाऊंडेशन तर्फे गुडिपाडव्याला महिलांची भव्य रॅली*

दरवर्षी आधारविश्व फाऊंडेशन तर्फे गुडीपाडव्याला महिलांची स्कुटी रॅली काढण्यात येते . परंतु गेली तीन वर्ष कोरोनामुळे ही रॅली रद्द करण्यात आली होती. यावर्षी आधारविश्व फाऊंडेशन तर्फे 22 मार्च रोज बुधवारी गुडीपाडव्याला सकाळी 8 वाजता मराठी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी ढोलताशा व लेझीम च्या गजरात महिलांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या रॅलीमध्ये सहभागी होऊन मराठी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करावे असे आवाहन आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे यांनी केले आहे.सर्वांनी 7-00 वा. इंदिरा गांधी चौकातील गेस्ट हाऊस मध्ये जमायचे आहे. तिथेच सर्वांना फेटे बांधून मिळेल.8 वा.इंदिरा गांधी चौकातून रॅलीचा प्रारंभ होईल. तिथून बी फॅशन प्लाझा, सपना क्लाथ कडून वळून चंद्रपूर रोड वरून पुन्हा इंदिरा चौकातून चामोर्शी रोड वर येऊन राधे बिल्डिंग समोर रॅलीचा समारोप होईल.नऊवारी नथ व फेटा या वेशभूषेत महिलांनी सहभागी व्हावे.अधिक माहितीकरिता *गीता हिंगे 9168164441* *सुनीता साळवे* *विना जंबेवार* *विजया मने* *सुचिता धकाते* *दिप्ती वैद्य* *मीनल हेमके* *उज्वला शिंदे* *अंजली कुळमेथे* यांच्याशी संपर्क करावा

Don`t copy text!