*जुगनाळा येथे ग्रामीण रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन*
*माजी जि. प. सदस्य प्रमोद भाऊ चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न*
ब्रम्हपुरी/
तालुक्यातील जुगनाळा येथे राजे छञपती शिवाजी महाराज कबड्डी क्लब, जुगनाळा यांच्या वतीने कबड्डीप्रेमिंसाठी हेमराज ठाकरे यांच्या भव्य आवारात ग्रामीण रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे (55 किलो वजन) आयोजन करण्यात आलं आहे.
या कबड्डी स्पर्धेचा *उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडला.*
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, उपाध्यक्ष म्हणून भिमानंद मेश्राम सर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर मेश्राम माजी सरपंच, किरण बगमारे, अण्णाजी बगमारे, गिरीधर ठाकरे, योगीराज बगमारे, सुरेश चौधरी, देवराव सलामे, रीमाजी ठाकरे, नितेश खुळशिंगे, ताळीराम ठाकरे, प्रमोद मेश्राम, पांडुरंग बगमारे, कवळू चट्टे व अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील असलेला हा खेळ, या खेळाला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. ही परंपरा कायमस्वरूपी पुढे चालू ठेवावी. जुगनाळा मधे कबड्डी स्पर्धा भरवल्याने मनापासून आनंद झाला आहे. तरुणांची खेळाप्रती रुची वाढवणे आणि त्यांना अधिक प्रतिभावान बनवणे हा अश्या स्पर्धांचा मुख्य उद्देश असला पाहिजेत. अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या स्पर्धेमध्ये हजारोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ग्रामीण रात्रकालीन कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघास माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडून 15 हजार रोख आहे. द्वितीय पारितोषिक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्याकडून 10 हजार रुपये रोख, तृतीय पारितोषिक माजी जि. प. सदस्य राजेश कांबळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष खेमराज तिडके व भिमानंद मेश्राम यांच्याकडून 7 हजार रुपये रोख देण्यात येईल.






