*श्रीराम नवमी निमित्ताने खासदार अशोक नेते यांनी तळोधी (मो) येथे केले श्रीरामाचे पूजन*
———————————————-
*याप्रसंगी गडचिरोली जिल्हा वासीयांना दिल्या श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा*
———————————————–
*तळोधी (मोका.) येथे श्रीराम नवमी निमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रमासह बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे वतीने कलश यात्रा, प्रबोधन ,महाप्रसाद शोभायात्रेचे भव्य आयोजन*
———————————————–
*दिनांक – ३० मार्च २०२३
*गडचिरोली:- श्रीराम नवमी निमित्ताने चामोर्शी व तलोधी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्य अतिथी खासदार अशोकजी नेते यांनी यानिमित्त भगवान श्रीरामाचे विधिवत पूजन करून आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांनी समस्त जिल्हा वासीयांना प्रामुख्याने श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्यात*
*यावेळी मुख्य अतिथी आमदार देवराव होळी ,मनोहर बोदलवार सरपंच तडोधी , डॉ मिलींद नरोटे, स्पदन फाऊंडेशन, प्रमुख वक्ते शंकर बोरकर , जिल्हा महामंत्री विश्व हिंदू परिषद, रामायणजी खटी ,वी,स,प्रमुख , विश्व हिंदू परिषद ,नगरसेवक आशीष भाऊ पिपरे ,उपस्थित होते उपस्थितांना खासदार अशोकजी नेते ,आमदार देवराव होळी , प्रमूख वक्ते शंकरजी बोरकर , डॉ,मिलींद नरोटे, नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी मार्गदर्शन केले तळोधी येथे विश्व हिंदु परीषद व बजरंग दल यांच्या वतीने २९ मार्च पासून विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले काल ग्रामस्वच्छता अभियान , वृक्षरोपण , रामधुन , महाआरती आयोजित करण्यात आले, यावेळी आज सकाळी रामनवमी उत्सव सोहळा निमित्त कलश यात्रा व नुकताच प्रबोधन कार्यक्रम , पार पडला व आज दुपारी महाप्रसाद व सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे तसेच नुकताच आयोजित प्रबोधन कार्यक्रमात गावातील रामभक्त नागरिक ,स्थानिक बजरंग दल , विश्व हिंदु परीषद कार्यकर्ते पदाधिकारी ,गावातील प्रतिष्ठित नागरिक ,युवक महीला बचत गट पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*







