गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी अतिदुर्गम मौजा तुमरकोठी गावात सुरळीतपणे विद्युत सेवा सुरू
. पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले विद्युत बल्ब व साहित्याचे वाटप
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहूल व माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्र व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आदिवासी नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी जिल्ह्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाया हेडरी उपविभागातील मौजा तुमरकोठी येथे आज दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सहकार्याने सुरळीतपणे विद्युत सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामूळे स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होणार आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, मौजा तुमरकोठी येथे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली होती. सदर पोलीस स्टेशन स्थापनेमूळे दीर्घकाळापासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या तुमरकोठी गावात विकासाला चालना मिळाली आहे. या विकासाला गतीमान करण्यासाठी दुर्गम भौगोलिक परिस्थिती, वाहतुकीची कमतरता आणि सुरक्षा संदर्भातील अडचणी असूनही पोलीस दलाने संबंधित विभागांशी समन्वय साधून मौजा तुमरकोठी गावामध्ये विद्युत पुरवठा सुरु केलेला आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यामूळे गावातील नागरिकांना आता प्रकाश, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच विद्याथ्र्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. यावेळी आयोजित कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना पोलीस दलाच्या वतीने 100 बल्ब, 100 होल्डर, वायर व आवश्यक साहित्य मोफत पुरविण्यात आले. यामुळे नागरिकांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल होणार आहेत, अशी आशा पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वीच दिनांक 16/07/2025 रोजी मरकणार ते अहेरी मार्गावर तसेच दिनांक 17 मार्च 2026 रोजी स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर प्रथमच गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, गडचिरोली यांच्या सहकार्याने मौजा तुमरकोठी ते अहेरी या मार्गावर बससेवा देखील सुरु करण्यात आली होती. तसेच तेथील नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दिनांक 28 फेब्राुवारी 2026 रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आरोग्य मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात येऊन 200 हून अधिक नागरीकांना लाभ देण्यात आला होता. तसेच सामान्य नागरिकांच्या दळण-वळणाच्या मुलभूत प्रश्नावर उपाय करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या संरक्षणात जिल्हाभरामध्ये एकूण 559 मोबाईल टॉवर्सची उभारणी करण्यात आली असून, एकूण 424 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे आणि 65 पुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सदर उपक्रमांमूळे प्रशासन आणि नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ करणारा ठरत आहे. यासोबतच अशा विकासकामांमूळे दुर्गम भागातील नागरीकांना मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल.
सदर उपक्रम पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक अभियान) श्री. विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी श्री. योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपीएफ 191 बटा एफ कंपनीचे पोनि. होनप्पा, पोस्टे तुमरकोठीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. गोेरखनाथ सुरासे, कनिष्ठ अभियंता श्री. रोशन मानकर व पोस्टे तुमरकोठीचे इतर अधिकारी आणि अंमलदार यांच्या प्रयत्नांनी पार पडला.







