विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूर च्या वतीने विश्ववंदनीय महात्मा गांधीजींना वाहिली श्रद्धांजली

131

विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूर च्या वतीने विश्ववंदनीय महात्मा गांधीजींना वाहिली श्रद्धांजली
(चंद्रपूर ३० जानेवारी २०२१)
शनिवार दिनांक ३० जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार मा. श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व युवा नेता श्री राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात विश्ववंदनीय महात्मा गांधीजी  यांना अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला
गांधी चौक चंद्रपूर येथील महात्मा गांधीजींच्या पूर्णाकृती पुतळ्याला माननीय श्री राहुल पुगलिया, विदर्भात किसान मजदूर काँग्रेसचे (ग्रामीण) अध्यक्ष श्री गजाननराव गावडे (गुरुजी), विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे (चंद्रपूर शहर)अध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र बेले, सेवादलाचे श्री अशोक आक्केवार, नगरसेवक अशोक नागापुरे यांनी पुष्पहार अर्पण केले व सलामी देऊन मुक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी इंटकचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे, काँग्रेसचे सुधाकरसिंहं गौर, माजी नगरसेवक विनोद पिंपळशेंडे, श्री महेंद्र जयस्वाल, श्रीनिवास पारधी, काँग्रेसचे भारत जंगम,रतन शिलावार,श्री अजय महाडोळे, राजीव नंदनवार, असलम भाई, अरुण बुरडकर, बाबुलाल करुणाकर,इत्यादी उपस्थित होते.