*महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९६ व्या जयंती निमित्याने राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी राष्ट्रपिता म.फुले यांना अभिवादन केले

71

*महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९६ व्या जयंती निमित्याने राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी राष्ट्रपिता म.फुले यांना अभिवादन केले.*

_________________________

_________________________

 

*क्रांतिसुर्य म.ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक, राजकीय व सामाजिक कार्य युवकांना नवी दिशा नेणारे मुलमंत्र आहेत, महापुरुषांचे विचार आत्मसात करूनच देश प्रगती करेल -माजी मंत्री श्री.विजय वडेट्टीवार यांचे अभिवादनाच्या कार्यक्रमा-प्रसंगीचे प्रतिपादन*

 

__________________________________________________

 

*दिनांक: ११ एप्रिल २०२३*

 

*सिंदेवाही* :

 

*जातीयवादाच्या चक्रात सापडलेल्या दिन दुबळ्यांचे कैवारी, त्याग,आदर्श, साहस ह्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले व कुप्रथा अविद्येच्या गर्तेतील भारतीय समाजासाठी समतेची पहाट आणणारे,राष्ट्रपिता,शिक्षणसम्राट, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला आज जयंतीदिनी सिंदेवाही येथे पुष्पहार अर्पण करून आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी अभिवादन केले.*

 

*महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे,बहुजनांचे उध्दारक,सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत,क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना क्रांतिसुर्य म.ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक, राजकीय व सामाजिक कार्य युवकांना नवी दिशा नेणारे मुलमंत्र आहेत, महापुरुषांचे विचार आत्मसात करूनच देश प्रगती करेल आद्यक्रांतिकारक असून त्यांचे विचार आजच्या युवकांनी अंगीकरण्याची गरज असून कोणत्याही वाईट संगतीत न पडता ,अभ्यास करून देशोउन्नती सहकार्य करावे असे प्रतिपादन आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केले.*

 

*यावेळी नगराध्यक्ष श्री.स्वप्नील कावळे व काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.*