*शासकीय योजनांची जत्रा यातून गरजू लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावे*
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी या*
*या कार्यक्रमाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी प्रत्येक विभागाने व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून कार्यक्रमाची माहिती द्यावी*
*गडचिरोली तालुक्यातील पोर्ला , अमीर्झा, कोटगल, पोटेगाव, गोविंदपुर, व जेप्रा येथे भरणार शासकीय योजनांची जत्रा*
*शासकीय योजनांची जत्रा मध्ये सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी सहभागी होत असल्याने आपल्या समस्या यातून सोडवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा*
*दिनांक १७ एप्रिल २०२३ गडचिरोली*
*मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियान अंतर्गत शासकीय योजनांची जत्रा महाराजस्व अभियान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून यातून शासन निर्णयांच्या योजनांची गतीने अंमलबजावणी व्हावी व शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक गरजूला लाभ मिळावा याकरिता शासन प्रयत्नशील आहे. याकरिता प्रत्येक विभागाने या कार्यक्रमाची माहिती प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावी यासाठी आपापल्या माध्यमातून जाहिराती , फेसबुक, व्हाट्सअप ,कोतवालाच्या मार्फत मुणारी अशा सर्व माध्यमातून या कार्यक्रमाची माहिती द्यावी असे निर्देश गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव जी होळी यांनी तहसील कार्यालय गडचिरोली येथे तहसीलदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित सर्व विभागांच्या या संबंधित अधिकाऱ्यांना दिले.*
*बैठकीला गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांचे सह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते*
*आपल्या गडचिरोली तालुक्यामध्ये दिनांक २० एप्रिल ला पोर्ला ,२४ एप्रिल अमिर्झा ,४ मे कोटगल ,१२ मे पोटेगाव गोविंदपूर येथे ९ मे, तर२६ मेला जेप्रा येथे ही जत्रा भरणार असल्याची माहिती या प्रसंगी तहसीलदार गणवीर जी यांनी आमदार महोदयाना दिली.*
*या शासकीय योजनांच्या जत्रेमध्ये पंचायत विभाग, महसूल, कृषी, आरोग्य, एम एस ई बी, शिक्षण यासहसर्व विभागांचा समावेश राहणार असून त्या विभागाशी संबंधित असणारी आपली समस्या त्या ठिकाणी मांडावी व त्या माध्यमातून आपली दाखले प्रमाणपत्र मिळवावेत आपल्या समस्येचा निपटारा करावा असे आवाहन आमदार टाकून देवराव जी होळी यांनी केले आहे.*
*सर्व विभागाच्या लोकांनी या शासकीय योजनांच्या जत्रेची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे याची दक्षता घ्यावी .त्यासाठी आवश्यक मोबाईल, फेसबुक व्हाट्सअप, ट्विटर, संपर्क ,कोतवालाच्या माध्यमातून मुनारी देणे ,अशा विविध माध्यमांचा वापर करून प्रत्येकापर्यंत माहिती पोहोचवावी व त्यातून आलेल्या प्रत्येक गरजूला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असे निर्देश आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी या बैठकीच्या माध्यमातून उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.*



