Home गडचिरोली बांबू लागवडीतून आपल्या ग्रामसभा सक्षम करा* *आमदार डॉक्टर...

बांबू लागवडीतून आपल्या ग्रामसभा सक्षम करा* *आमदार डॉक्टर देवरावजी होळी

81

*बांबू लागवडीतून आपल्या ग्रामसभा सक्षम करा*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी*

 

*बांबू लागवडी संदर्भामध्ये वनविभागाचे अधिकारी व ग्रामसभांच्या पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक*

 

*जेवढी मंजुरी तेवढ्याच बांबूची तोड करा व त्यापेक्षा अधिक लागवड करा यातूनच ग्रामसभांचा आर्थिक विकास*

 

*आंबा ,चिकू ,फणस, चिंच, ताळ,नारळ, हिरडा बेहडा यासारख्या फळ व त्यातून उत्पन्न देणाऱ्या फळ वृक्षांची ही सोबत लागवड करा*

 

दिनांक १७/४/२०२३ गडचिरोली

 

*गडचिरोली जिल्ह्यात ग्रामसभांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बांबूची तोड केली जाते मात्र त्या प्रमाणात बांबूची लागवड करण्यात येत नसल्याने बांबू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ग्रामसभांनी बांबू तोडण्यासाठी जेवढी मंजुरी आहे तेवढेच बांबू तोडून त्यापेक्षा जास्त पटीने बांबू लागवड केल्यास त्यातून ग्रामसभांना मोठा आर्थिक फायदा होईल त्याकरिता ग्रामसभांनी या पद्धतीने नियोजन करावे अशी सूचना गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी बांबू लागवडी संदर्भामध्ये वनविभागाचे अधिकारी व ग्रामसभांच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये केले.*

 

*वनविभाग गडचिरोली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये गडचिरोली वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिष शर्माजी, ए.सी.एफ. श्री भडके साहेब, गडचिरोली धानोरा तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी, बांबू तोड व लागवड संबंधित दोन्ही तालुक्यातील ग्रामसभांचे पदाधिकारी या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते.*

 

*यावेळी बोलताना आमदार होळी म्हणाले की ग्रामसभांनी या संदर्भामध्ये दर महिन्याला या संदर्भात आढावा घेणे आवश्यक आहे आपल्याला ज्या प्रमाणात बांबू तोडण्यासाठी परवानगी मिळाली असेल तेवढेच बांबूची तोड करावी व ती लावण्यासाठी उपाययोजना टाकली नाही करावी सोबतच आंबा ,चिकू ,फणस, चिंच, ताळ,नारळ, हिरडा बेहडा यासारख्या फळ व त्यातून उत्पन्न देणाऱ्या फळ वृक्षांची लागवड केल्यास त्यातून नाही ग्रामसभेला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उत्पन्न मिळू शकेल या दृष्टीने ग्रामसभांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी यांनी या प्रसंगी केले.*

Don`t copy text!