शिक्षण आयुक्त यांच्या नागपूर दौऱ्याने या समस्या सोडवण्याची मागणी
मराशीप संघटनेचे निवेदन
चामोर्शी :
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे हे दोन दिवशीय नागपूर दौऱ्यावर येत असून या विभागातील काही समस्या अजूनही कायम असून मराशीप संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष माजी आ.नागो गाणार यांनी शिक्षण आयुक्त यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले की ,
या दौऱ्यात खालील समस्याचा आढावा घेऊन ती प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याची गरज आहे.दप्तर दिरंगाई कायदा व सेवाहमी कायद्यातील तरतुदीनुसार कर्तव्य व जबाबदारी पार न पाडणाऱ्या जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांचे विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबाबत २३ फेब्रुवारी २०२३ व१३ एप्रिल २०२३ ला निवेदन दिले आहे. तसेच २ मे २०१२ व त्यानंतर नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यता प्रकरणाची चौकशी करण्याबाबत ,शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.चंद्रपूर यांनी १ मार्च २०१९ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत दिलेल्या वैयक्तिक मान्यता प्रकरणी चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून उल्हास नरड विभागीय सचिव अमरावती विभाग अमरावती यांची नियुक्ती आपण केली परंतु त्याना शिक्षणाधिकारी कार्यालयाने संबंधित प्रकरणाच्या नस्ती उपलब्ध करून दिल्या नाही प्राप्त माहितीनुसार ५० ते ६० नियुक्ती मान्यता प्रकरणाच्या नस्ती नष्ट व गहाळ करण्यात आल्या आहेत सदर प्रकरणी ११ मार्च २०२४ व २ एप्रिल २०२३ ला आपण निवेदन दिले आहे. कल्पना चव्हाण शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.चंद्रपूर यांना तात्काळ निलंबित करुन त्याना दिलेल्या अल्पसंख्याक शाळेतील नियमबाह्य मान्यता प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी.रवींद्र कटोलकर शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.वर्धा येथे कार्यरत असताना त्याना पोलिस विभागाने फोऊजदारी गुन्ह्यात अटक केली सध्या ते जमानतीवर आहेत त्यामुळे त्याना शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.नागपूर या मुख्य पदावर बदली देणे शासनाच्या धोरणाविरुद्ध आहे. म्हस्के सेवानिवृत्त उपशिक्षानाधिकारी माध्यमिक चंद्रपूर यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी असलेली चौकशी तात्काळ पूर्ण करावी.शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.गोंदिया येथील ८५ बोगस व नियमबाह्य नियुक्त्या संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल करावी.नागपूर विभागाचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक महेश करजगावकर यांचे विरुद्ध दीर्घ काळापासून सुरू असलेल्या गैरप्रकार चौकशी निर्णय घेणे,आपल्या दौऱ्यातुन या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करून शिक्षण विभागातील भ्रष्टाचार थांबवा अशीही मागणी माजी आमदार नागो गाणार यांनी केली आहे.



