*बानाई तर्फे शिष्यवृत्ती वितरण समारंभ*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अर्थात बानाई, चंद्रपूर तर्फे महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दिनांक 22-04-2023 ला दुपारी 1:00 वाजता मा.सा.कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे आयोजित समारंभात 27 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
कोणत्याही जाती अथवा धर्मावर आधारित निकष न ठेवता निवडीमध्ये सर्वसमावेशकता ठेवण्यात आली हे या शिष्यवृत्तीची विशेषता. ही शिष्यवृत्ती कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमकरिता मुख्य अतिथि मा. श्याम वाखर्डे साहेब, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), जि.प. चंद्रपुर हे असतील तर मा. डॉ. बंडू रामटेके वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर तसेच प्रा. डॉ. टि.डी. कोसे, डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम, चंद्रपूर व इंजि. रमेश शंभरकर, कार्यकारी अभियंता, जि.प. (बांधकाम) विभाग, चंद्रपूर हे विशेष अतिथि राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजि. यशवंत बर्डे अध्यक्ष “बानाई” चंद्रपूर हे भूषवतील.
धन्यवाद.



